आपल्या शरीरात एक अदृश्य सिक्युरिटी गार्ड असतो. त्याचं नाव आहे कॉर्टिसॉल (Cortisol). कॉर्टिसॉल हा एड्रेनल ग्रंथींमधून तयार होणारा स्ट्रेस हार्मोन आहे. त्याचं काम आपल्याला घाबरवणं नाही, तर धोका ओळखून शरीराला वाचवणं आहे. धोका जाणवला की तो शरीराला एकच आदेश देतो… “पळ… किंवा लढ!” (Fight or Flight)
Fight or Flight म्हणजे नेमकं काय?
आजपासून सुमारे २ लाख वर्षांपूर्वी माणूस जंगलात राहत होता. त्यावेळी समोर वाघ, सिंह किंवा शत्रू दिसला की विचार करायला वेळ नव्हता. क्षणात निर्णय घ्यावा लागायचा… Fight (लढायचं) की Flight (पळायचं)? त्यासाठीच निसर्गाने ही अद्भुत यंत्रणा तयार केली.
प्राचीन मेंदू कसा काम करतो?
आपल्या मेंदूत Amygdala (अमिगडला) नावाचा एक अतिशय जुना भाग आहे. तो विचार करत नाही, तर्क करत नाही. तो फक्त एकच प्रश्न विचारतो… “धोका आहे का?” धोका वाटला की तो लगेच HPA Axis सक्रिय करतो आणि एड्रेनल ग्रंथींना आदेश देतो… “कॉर्टिसॉल आणि एड्रेनालाईन सोडा!” काही सेकंदांतच शरीर बदलायला लागतं.
❤️ हृदय वेगाने धडधडतं.
🫁 श्वास वेगवान होतो.
💪 स्नायू सज्ज होतात.
🍽️ पचन मंदावते.
🎯 लक्ष फक्त धोक्यावर केंद्रित होतं.
वाघापासून जीव वाचवण्यासाठी ही यंत्रणा लाखो वर्षे उपयोगी पडली.
आजचा “वाघ” कोण?
आज जंगल नाही… पण आपल्या प्राचीन मेंदूला ते अजून समजलेलं नाही. त्याच्यासाठी…
📱नोटिफिकेशन्स
💰 EMI
👔 बॉसचा फोन
🚗 ट्रॅफिक
📲 सोशल मीडियावरील तुलना
…हे सगळंच “धोका” असू शकतं. म्हणून कॉर्टिसॉलचा अलार्म पुन्हा पुन्हा वाजत राहतो. शरीराला वाटतं… “धोका अजून संपलेला नाही!”
याचा शरीरावर काय परिणाम होतो?
जेव्हा शरीर सतत Emergency Mode मध्ये राहतं, तेव्हा त्याचे मदतनीसही थकायला लागतात.
🟢 मॅग्नेशियम:
“मी मेंदू आणि स्नायू शांत ठेवतो… पण मलाही विश्रांती हवी!”
🟡 व्हिटॅमिन B1:
“ऊर्जा देतो… पण इतका ओव्हरटाईम नको!”
🩷 व्हिटॅमिन B6:
“मूड आणि सेरोटोनिन सांभाळतो… मलाही थोडं रिलॅक्स होऊ द्या!”
🔵 व्हिटॅमिन B12:
“नसा आणि मेंदूची काळजी माझ्यावर आहे… मला विसरू नका!”
म्हणूनच काही लोकांना कारण नसतानाही… धडधड, चिंता, बेचैनी, चिडचिड, झोप न लागणं, थकवा…अशा तक्रारी जाणवू शकतात.
म्हणून पुढच्या वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारा…
“समोर खरंच धोका आहे… की फक्त मनाचा गैरसमज?”
मग उपाय काय?
सर्वात आधी हे लक्षात ठेवा… प्रत्येक अलर्ट म्हणजे धोका नसतो. शरीराला पुन्हा “सुरक्षित आहोत” हा संदेश द्या.
ताण कमी करा, सकाळी १० मिनिटे भ्रामरी प्राणायाम करा. त्यामुळे नायट्रिक ऑक्साइड “१५ पटी” पर्यंत वाढतं. फायदे – रक्तदाब कमी करतं, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, हृदय स्वास्थ्य सुधारतं.
झोपण्यापूर्वी दररोज १० मिनिटे विपरीत करणीसारखी आरामदायी योगमुद्रा करा. विपरीत करणी (Legs-Up-the-Wall Pose) हे शरीरातील अनावश्यक कॉर्टिसॉल (Cortisol – स्ट्रेस हार्मोन) कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी योगासन आहे. रक्तदाब, हृदया संबंधित आजारांमध्ये वैद्यकीय सल्ला आवश्यक.
संतुलित आहार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक असल्यास मॅग्नेशियम व बी-व्हिटॅमिन्सचा विचार करा. शरीराचा अलार्म तेव्हाच योग्य वेळी वाजेल!


