हवा कृत्रिम बुद्धिमत्तेची

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा सगळीकडे बोलबाला सुरू आहे.

संधीसाधू लोक त्याचा फायदा घेत इकडचा तिकडचा मसाला गोळा करून हजारो रुपये घेऊन ऑनलाइन कोर्सेस विकत आहेत.

येरे गबाळे लोक ह्या गुरुं कडून प्रॉम्प्टचे थातुर मातुर ग्यान (जे युट्यूब वर फुकट मिळू शकतं) घेऊन AI वापरायला सुद्धा शिकले.

मागं राहिलेत कोण तर ज्यांना ते खरं वापरायची गरज आहे आणि तेवढी अक्कल पण आहे. कारण काय तर हे काहीतरी हायफाय आहे किंवा आपल्याला त्याचा काय फायदा हा दृष्टिकोन!

एखादी गोष्ट वापरून जास्त कळते (उदा. मोबाईल, कार) त्याचं औपचारिक शिक्षण घेण्यापेक्षा. वापरताना एखादी अडचण आली तर युट्यूब आहेच की मदतीला.

बोलाची कढी बोलाचाच भात तसं आहे… माझं हे हे काम असतं मला AI चा कसा उपयोग होऊ शकतो कोणाला विचारणार? अहो हे पण AI लाच विचारा ना!

ChatGPT नक्कीच छान साधन आहे, पण मोफत मर्यादांमुळे (क्वेरी लिमिट, खोलवर प्रश्न, काही ॲडव्हान्स्ड फिचर्स) अनेकदा अडचण येते. पेड सबस्क्रिप्शनच घ्यावं लागतं.

पण आता त्याला एक पर्याय आहे—Perplexity AI. हे टूल ChatGPT पेक्षा रिसर्च आणि रिअल-टाईम माहिती शोधण्यासाठी अधिक सक्षम आहे. शिवाय यात विविध AI मॉडेल्स वापरता येतात.

याचं वार्षिक सबस्क्रिप्शन जवळपास ₹17,000 इतकं आहे.

पण खुशखबर अशी की—
👉 Airtel चे कोणतेही सबस्क्राइबर्स (Voice किंवा Broadband) यांना Perplexity Pro चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन फुकट मिळते!

ते मिळवायचं कसं?

1) Airtel Thanks App उघडा

2) Rewards & OTTs विभागात जा

3) Claim Perplexity Pro निवडा आणि प्रोसेस पूर्ण करा

चला तर मग वापरून बघू कसं असतं AI आणि त्याचे वेगवेगळे फिचर्स. तुम्ही म्हातारे झाला असाल तर तुमच्या मुलांना सांगा (पण ते त्याचा गैरवापर करणार नाहीत ह्याची पण काळजी घ्या ☺️)

error: Content is protected !!