✍️विजय लिमये (9326040204)
आपल्या देशात पेणचे शाडू मातीचे गणपती प्रसिद्ध आहेत, अनेक दशकांपासून पेणकरांनी गणपती बनवण्याच्या व्यवसायावर अनभिषिक्त राज्य केले. पुढे मातीच्या गणेश मूर्तींचे जास्त वजन असल्याने आणि वाहतुकीची किंमत वर्षागणिक वाढल्याने, व्यापाराचा ताळमेळ बसवणे अवघड होत गेले, त्याचा परिणाम, शाडू मातीच्या मूर्ती महाग झाल्या. इथेच, पीओपी मूर्ती बनविनाऱ्यांनी आपले पाय पसरायला सुरुवात केली, आणि या व्यवसायावर ताबा मिळवला.
पुढचा काळ पीओपी गणपतींचा आला आणि देशभर पीओपी मूर्ती सर्वत्र दिसू लागल्या. पीओपी मूर्ती देखण्या असतात, साचे वापरून केल्याने कमी वेळेत जास्त संख्येने बनविल्याने किंमत कमी असते. विकणाऱ्यांचे कमिशन यातून आपसूक वाढले, परंतू पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला. एकूणच शाडू माती आणि पीओपी मूर्ती पर्यावरणावर आघात करणाऱ्या असतात.
गोमय वसते लक्ष्मी, (शेणामध्ये लक्ष्मीचा वास असतो) असे हिंदू धर्मात मानले जाते. आता पुढची क्रांती गोमय गणपतीची राहणार आहे. गोमय गणपती म्हणजेच गाईच्या शेणापासून बनवलेल्या बाप्पाच्या मूर्ती. गोमय मूर्तींचा फायदा असा, की वजनाला अतिशय हलक्या असतात. बनविण्यासाठी गोमय वापरल्याने पर्यावरणास कोणतीच हानी होत नाही, उलट झाला तर त्याचा लाभच होतो.
पुढे गोमय गणपती बनवणाऱ्या कारागिरांना आवाहन आणि विनंती आहे, गोमय बाप्पा अतिशय हलके असल्याने, त्यांचे वजन वाढवण्यासाठी त्यांच्या पोटात धान्य भरावे, म्हणजे वजनी बाप्पा स्थिर राहतील.
धान्य भरलेले गोमय गणपती कोणत्याही नैसर्गिक जलाशयात जसे विहीर, तलाव, नदी अथवा समुद्रात विसर्जित करण्यास हरकत राहणार नाही, त्याचा जलाशयातील जीवांना फार मोठा फायदा मिळणार आहे.
साधारण श्रावण महिन्यात मासे जलाशयात अंडी देतात आणि पुढे काही दिवसात अंड्यातून पिल्ले जन्माला येतात. अनंत चतुर्दशीच्या आसपास, जन्माला आलेल्या पिल्लांना गोमय आणि धान्य खायला मिळेल. मोठे मासे छोट्या पिल्लांना पकडण्यासाठी आटापिटा करण्यापेक्षा, आपले पोट भरण्यासाठी सहज उपलब्ध झालेले मोड आलेले धान्य खातील, याप्रकारे सर्व माशांना आणि जिवजंतूना मुबलक अन्न मिळू लागले तर, मोठे मासे लहान माशांना खातील पण कमी संख्येने, ज्याचा परिणाम, माशांची पिल्ले जगण्याची शक्यता वाढेल. जगण्याची शक्यता वाढल्यामुळे, पुढे जास्त संख्येने पिल्ले मोठी होणार, आणि पूर्ण वाढ झालेल्या मासोळ्या अलगद माणसांच्या ताटातून पोटात जाणार. अर्थात “जीवो जीवस्य जीवनम्” शृंखला पूर्ण होणार.
गोमय बाप्पा सर्वार्थाने पर्यावरणपूरक ठरतील. शेण खताचा पाण्यातील वनस्पतींना उपयोग होणार. बदल हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, सकारात्मक बदल केल्याने वसुंधरा सुंदर, निर्मळ, टवटवीत, राहील, हिच आपल्या येणाऱ्या वारसांना अमूल्य भेट असेल.
गणेश पूजन, लक्ष्मी पूजन, पर्यावरण/निसर्ग पूजन (प्रदूषण रोखले जाते), जल सजीवांना अन्नदान (अन्नदान – श्रेष्ठ दान), वनस्पतींना अन्न दान. एकूणच गोमय गणेशाचे इतके फायदे आहेत, ज्यातून जिवजंतूंचे रक्षण करोनी, हातून पुण्यकर्म घडवू.
यावर्षीपासून संकल्प करू l
केवळ गोमय बाप्पाच घरी आणू ll
गोमय गणेश मूर्तीसाठी यांना संपर्क करावा
१) सुचित्राजी गडद, सोलापूर (+919511695979)
२) गणेशजी गुंडामी, सोलापूर (+919577955577)
३) तुलसिजी सारडा, लासलगाव, नाशिक (+917775916185)
४) महादेवजी शिर्के, कोल्हापूर (7822927308, 9082474030)
५) गुलाबकाका यादव, सांगली
(9096944006, 7972406452)
६) राजशेखरजी कोळी
(9482303039)
७) विश्वास पाटकर, मुंबई
(9819106503)
ll गणपती बाप्पा मोरया ll


