अमेरिकन कुतूहल vs जपानी शहाणपण

अमेरिकेच्या उद्योगजगतातील एक शिष्टमंडळ जपानमधील एका कंपनीला भेट द्यायला जातं. त्यांची अपेक्षा असते की जपानी कंपनी त्यांना एक साधं प्रेझेंटेशन दाखवेल आणि थोडक्यात माहिती देऊन बोळवण करेल. पण त्यांच्या अपेक्षांपेक्षा उलट, त्या जपानी उद्योजक आणि त्यांच्या टीमने संपूर्ण कंपनी फिरवून दाखवली आणि पाहुण्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक आणि सविस्तर उत्तर दिलं.

शेवटी, क्लोजिंग मिटिंगमध्ये एका अमेरिकन प्रतिनिधीला कुतूहल वाटून तो विचारतो: “तुम्ही आम्हाला इतकं सगळं उघडपणे दाखवलं, कुठलाही आडपडदा न ठेवता. तुम्हाला भीती नाही वाटत का की आम्ही हे सगळं कॉपी करून तुमच्याशीच स्पर्धा करू?”

त्यावर त्या जपानी अधिकाऱ्याने शांतपणे उत्तर दिलं: “तुम्हाला आम्ही जी फळं दाखवली, ती तुम्ही घेऊन जात आहात. पण फळं लावून फळं मिळतील याची खात्री नाही. कारण त्या फळांसाठी आम्ही जी बीजं वापरली, ती कुठली हे तुम्ही पाहिलंच नाही.”

सार:
यशाच्या बाह्य रूपांची नक्कल करून यश मिळेलच असं नाही. खरी ताकद असते विचारांमध्ये, प्रक्रियेत आणि त्या विचारांना जगण्यात. ते समजलं, पचवलं आणि आचरणात आणलं, तरच ईप्सित फळ मिळतात.

error: Content is protected !!