१.
बर्नार्ड शॉ एकदा म्हणाला, पृथ्वी सूर्याभोवती फिरते वगैरे गोष्टी साफ झूट आहेत. सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, हेच खरं आहे.
लोक म्हणाले, अहो, दोनतीनशे वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या सगळ्यांचीच ही समजूत होती, हे खरं आहे. पण, आता विज्ञानाने सिद्ध केलंय की पृथ्वीच सूर्याभोवती फिरते.
शॉ म्हणाला, विज्ञान बिज्ञान गेलं चुलीत. सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही.
लोकांनी विचारलं, पण, अशी तुमची खात्री कशावरून झाली.
शॉ म्हणाला, ज्या पृथ्वीवर मी राहतो, साक्षात बर्नार्ड शॉ राहतो, ती सूर्याभोवती फिरेलच कशी, सूर्यच तिच्याभोवती फिरला पाहिजे.
…
…
….
२.
बर्ट्रांड रसेलने एकदा एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं, प्रिय वाचक, तुम्ही ज्या देशाचे नागरिक आहात, तो देश जगातला सर्वात श्रेष्ठ देश आहे.
…
…
त्याला पोलंडहून एका स्त्रीने कळवलं, पोलंडची श्रेष्ठता मान्य करणारा तू कदाचित पहिलाच नॉन-पोलिश माणूस असशील. आभार.
…
…
जर्मनीहून एकाने कळवलं, अखेर तुला जर्मनीची महती कळली म्हणायची.
~ ओशो
तात्पर्य : येड्यांच्या वस्तीत उपहासगर्भ विनोद करायला जाऊ नये. येडे ते सिरियसली घेतात आणि आपल्या श्रेष्ठतेचा पुरावा म्हणून इतर येड्यांना फाॅरवर्ड करत सुटतात!


