डिजिटल साक्षरता

लोकांना दुनियाभरचे सोशल मीडिया ॲप्स माहिती असतात. ते कसे वापरायचे, कसे लपवायचे आणि त्यातले ए टू झेड फीचर्स काय आहेत हे सगळं पाठ असतं. ॲमेझॉन, झोमॅटो, ओला, ब्लिंकइटसारखी ॲप्सही ते सहज वापरतात. गुगल पे, फोन पे वरून पेमेंट सुद्धा करतात.

पण क्रोम किंवा फायरफॉक्समध्ये (काहींना तर मोबाईलमध्ये ब्राउझर नावाचं काही असतं हे सुद्धा माहिती नसतं!) एखादी लिंक उघडून साधा फॉर्म भरायचा म्हटलं की मात्र अक्कल गुल होते. मग ह्याला त्याला “हे ऑनलाइन कसं करायचं?” असं विचारत बसतात.

कदाचित आपण सोशल मीडिया किंवा विविध ॲप्स वापरता येण्यालाच डिजिटल साक्षरता समजण्याची चूक करत आहोत. प्रत्यक्षात ॲप्स वापरणं आणि इंटरनेटचा प्रभावीपणे वापर करता येणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.

खरी डिजिटल साक्षरता म्हणजे फक्त फेसबुक, इन्स्टाग्राम वापरता येणं किंवा ॲमेझॉन-फ्लिपकार्टवरून वस्तू विकत घेता येणं नव्हे. गरज पडल्यास ब्राउझर वापरणं, माहिती शोधणं, फॉर्म भरणं, विविध वेबसाइट्सवर काम करणं, सेटिंग्ज समजून घेणं, सायबर सेक्युरिटी च्या बाबतीत सजग असणं आणि डिजिटल साधनांचा स्वयंपूर्णपणे वापर करता येणं ही खरी डिजिटल साक्षरता.

error: Content is protected !!