टीव्ही… जवळपास प्रत्येकाच्या घरात असलेली सर्वसाधारण गोष्ट (टीव्हीमध्ये वेळ घालवणं टाळतात, त्यांच्यासाठी ही पोस्ट उपयोगाची नाही). आता ज्यांनी टीव्ही ही ब्याद त्याच्या गुणदोषांसकट स्वीकारलेलीच आहे त्यांनी त्यांच्या “व्ह्यूइंग एक्सपिरियन्स” बाबत जागरूक असायलाच हवं ना!
लहान मुलांना कार्टून्स, स्त्रियांना सिरियल्स आणि पुरुषांना क्रिकेट मॅच साठी मस्ट हॅव थिंग आहे टीव्ही. सुस्पष्ट चित्र, व्हायब्रंट कलर्स, सुमधुर आवाज ही त्यातली बेसिक गरज. युट्यूब, नेटफ्लिक्स बघता येणं सोडलं तर स्मार्टनेस काही कामाचा नाही. तुमचा टीव्ही कसा आहे?
जर तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला कंटाळला असाल किंवा त्याच्यात काही बिघाड जाणवत असेल आणि नवीन घेण्याच्या विचारात असाल, तर… डोळे झाकून फक्त ब्रँड नेमसाठी जास्तीचे पैसे मोजू नका. तुम्ही खर्च केलेल्या पैशांत प्रत्यक्षात हवं ते (स्पष्टता, रंग, आवाज) मिळतंय का ते तपासा. दुकानदार किंवा सेल्समनवर विश्वास ठेवून “कुठला चांगला?” असं विचारण्याचा बावळटपणा करू नका — तो नफा कमावण्यासाठी बसलेला असतो.
टीव्ही तंत्रज्ञान थोडक्यात 👇
HD
➡️ 1280 × 720 पिक्सेल्स. SD (480p) पेक्षा जास्त स्पष्ट. सुरुवातीला वापरली जाणारी हाय-डेफिनिशन क्वालिटी.
Full HD
➡️ 1920 × 1080 पिक्सेल्स. जास्त स्पष्टता. आज बहुतेक टीव्ही/मोबाईलमध्ये किमान हीच क्वालिटी.
4K
➡️ 3840 × 2160 पिक्सेल्स (सुमारे 38 लाख). मोठ्या स्क्रीनसाठी उत्तम, बारकाईने आणि तीक्ष्ण चित्र.
8K
➡️ 7680 × 4320 पिक्सेल्स (सुमारे 33 दशलक्ष). Full HD पेक्षा 16 पट जास्त स्पष्टता. प्रीमियम पण अजून कंटेंट खूप कमी.
QLED
➡️ क्वांटम डॉट्समुळे रंग उठावदार. खूप उजेडातही नीट दिसतो. OLED पेक्षा स्वस्त.
Mini LED
➡️ सूक्ष्म LED बॅकलाइट्समुळे चांगला contrast आणि जास्त उजेड. HDR कंटेंटसाठी योग्य. OLED पेक्षा स्वस्त पण अनुभव जवळपास तसाच.
OLED
➡️ प्रत्येक पिक्सेल स्वतः उजेड देतो. परफेक्ट काळा रंग, अप्रतिम viewing angles. सिनेमॅटिक अनुभव. किंमत जास्त आणि खूप उजेडात चित्र थोडं कमी वाटू शकतं.
📌 नोट : 8K आणि OLED हे अजूनही लाखोंच्या घरात जाणारे प्रकार आहेत. बहुतेक लोकांच्या बजेटमध्ये न बसणारे.
म्हणून सर्वसामान्य ग्राहकांसाठी आजच्या घडीला QLED + 4K + Mini LED असलेला टीव्ही हा सर्वोत्तम पर्याय आहे.
साईज : 55″ हा बेस्ट. हॉल खूप मोठा असेल तर 65″ किंवा 75″.
ब्रँड : Hisense हा एक value-for-money पर्याय. फक्त तंत्रज्ञान नाही तर क्वालिटी सुद्धा. ऍमेझॉनवर उपलब्ध. मोठे ब्रँड्स काय करतात जुनंच तंत्रज्ञान (HD/FHD) महागात विकतात किंवा नवीन तंत्रज्ञान अजून जास्त पैसे घेऊन!
टीप – ह्यात अजून खूप बारकावे आहेत. इच्छुक लोकांनी पुढे स्वतःचा अभ्यास करावा.


