हरवलेल्या चाव्या

संध्याकाळची वेळ आहे. एक माणूस रस्त्यावरच्या दिव्याखाली गुडघ्यावर बसून आपल्या हरवलेल्या चाव्या शोधत आहे. त्याला त्याचा शेजारी मदतीला येतो आणि विचारतो, “तुमच्या चाव्या नेमक्या कुठे पडल्या?” माणूस उत्तर देतो, “अहो, त्या माझ्या मागच्या बागेत पडल्या आहेत. पण मी इथे शोधतोय कारण इथे उजेड चांगला आहे.”

ही गोष्ट ऐकायला अगदी वेडसर वाटते, पण मला तेव्हा आठवतं, ज्या वेळेस मी कठीण समस्या टाळण्यासाठी माझं डेस्क आवरायचं काम केलंय. काही लोक पैशांची उधळपट्टी करतात किंवा स्वतःला बरं वाटावं म्हणून दारू पितात, आणि यापेक्षा वेगळं काही नाही. चाव्या जिथे पडल्या तिथे शोधण्याऐवजी जिथे उजेड चांगला आहे तिथे शोधण्यासारखंच आहे हे.

error: Content is protected !!